सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल...!*_
_*2) जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला, जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही...!*_
_*3) सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं...!*_
_*4) आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर असतात. पण तीच चूक समजावून सांगून, आयुष्यभर साथ देणारे लाखात एक असतात...!*_
_*5) नात्यांमध्ये व्यवहार आणू नये हे जरी खरं असलं तरी नातं किती खरं आहे हे जाणून घेण्यासाठी एखादा व्यवहार करून बघावाच, त्यानंतर कदाचित बरेच गैरसमज दूर झालेले असतील...!*_
_*6) तुमच्या नावाच्या बदनामीच्या अफवा, फक्त दोनच प्रकारची लोकं पसरवत असतात. एक म्हणजे जे कधीच तुमची बरोबरी करु शकत नाही, आणि... दुसरे म्हणजे ते, ज्यांना त्यांच्या चुकीमुळे तुम्ही स्वत:पासून दूर केलंय...!*_
Tags:
