सुविचार
By -CDD
January 04, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही हे लक्षात ठेवा...!*_
_*2) इच्छा किती विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो, काही गोष्टी आणि काही व्यक्तींकडे दुर्लक्ष करायला शिका, तुमच्या अर्ध्याहून जास्त समस्या कमी होतील...!*_
_*3) जीवनात "स्तुती" एक वेळेस खोटी असू शकते, मात्र "द्वेष" किंवा "राग" कधीच खोटा नसतो...!*_
_*4) ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात, या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही...!*_
_*5) सल्ल्याचे शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त "मजबुत" आणि "समजूतदार" बनवते. तरुणपणी लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यात आमुलाग्र बदल घडवतात. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे अशक्यतेच्याही पुढे निघून जाणे...!*_
Tags:
