सुविचार
By -CDD
August 10, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची गरज असते...!*_
_*2) काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं...!*_
_*3) प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही.. ते कमवावी व मिळवावीच लागते...!*_
_*4) समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारं श्रीफळ आपल्याला संदेश देतं की, विश्वाचा खारटपणाही तू हृदयात साठव पण लोकांना मात्र गोडपणा देत जा.. स्वधर्म पालनात करवंटीप्रमाणे कठोर व अंतर्यामी मलई प्रमाणे नरम राहण्याचा बहुमोल जीवनमंत्र श्रीफळ आपल्याला देत असतं, जगात येतांना आपल्याकडे देह असतो नाव नाही, मात्र जग सोडतांना नाव असते देह नाही, मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य होय...!*_
Tags:
