सुविचार
By -CDD
January 04, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) काही अपमान असे असतात जे मनाला लागले ना, तरच आपण कामाला लागतो. ओळख मोठ्या व्यक्तींशी नाही, तर अडचणीत साथ देणाऱ्यांशी असावी...!*_
_*2) स्वभाव स्वच्छंदी ठेवता आला की, मन आपोआप आनंदी होऊन जातं ...!*_
_*3) मन फारच विचित्र असत... आपण चुकतो तेंव्हा तडजोड करायला बघतो, आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेंव्हा न्यायाची अपेक्षा करतो...!*_
_*4) चिक्कूची बी फळात राहूनही, फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे... आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकलं तरी, रसातून अलग होत नाही. परिणामी तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही. म्हणून चिक्कूच्या बी सारख वागावं सगळ्या मोहजाळात राहूनही, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोयीसारखं माया रुपी रसात गुरफटून रहाल तर, लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत...!*_
Tags:
