सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) स्वप्न नियतीने चुरगाळली तरी आपण तेवढ्याच अट्टहासाने कुरवाळायची असतात..! शांत राहण्याचा प्रयत्न करा अर्धे प्रश्न तिथेच सुटतील...!*_
_*2) समाज कितीही पुरूष प्रधान असला तरी संसार हा स्त्री प्रधानच आहे...!*_
_*3) एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिझा, फक्त एवढी काळजी घ्या की त्याने तूम्हाला लाकूड समजू नये...!*_
_*4) माणसाला जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात...!*_
_*5) नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसत. कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं. हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं...!*_
Tags:
