सुविचार
By -CDD
January 02, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) स्वतः च अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही, तर तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं...!*_
_*2) शक्तीची गरज तेव्हाच पडते जेव्हा एखादं वाईट काम करायचं असेल.. नाही तर जगातील कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी प्रेम पुरेसे आहे...!*_
_*3) विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही... त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते, परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासून भगवद्भक्ति होत नाही.*_
_*4) स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करु द्या.. काहीही फरक पडत नाही...!*_
_*5) पैसे नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे...!*_
_*6) दुसऱ्याचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतः च आत्मपरीक्षण केलेलं कधीही चांगलं...!*_
Tags:
