Change the Voice (Lesson - 17)
By -CDD
August 08, 2025
0
Change the voice
प्रयोग बदलवणे
Dear friends, today we are going to learn about to change the voice.
Active voice (कर्तरी प्रयोग)
Passive voice (कर्मणी प्रयोग)
नेहमी लक्षात ठेवा- 1) वाक्यात जर सकर्मक क्रियापद असेल तरच ते वाक्य passive voice मध्ये लिहिता येते.
2) Active voice मध्ये कर्त्याला प्राधान्य असते. करता सक्रिय असतो. 3) passive voice मध्ये कर्माला प्राधान्य असते. करता निष्क्रिय असतो. Active voice चे passive voice मध्ये रूपांतर करताना सर्वप्रथम आपणास त्या वाक्यातील कर्म शोधावे लागते व ते सुरुवातीस घ्यावे लागते. म्हणजेच दिलेल्या वाक्यातील कर्म शोधणे महत्त्वाचे असते. दिलेल्या वाक्यातील कर्म शोधण्यासाठी वाक्यातील क्रियापदांना आपणास what (काय) Whom (कोणाला) ही प्रश्नार्थक सर्वनामे वापरून प्रश्न विचारावे लागतात. What ने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर आलेले उत्तर म्हणजेच प्रत्यक्ष कर्म होय तर whom या प्रश्नार्थक सर्वनामाने विचारलेल्या प्रश्नाचे आलेले उत्तर म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म होय. म्हणजेच कर्माचे दोन प्रकार पडतात.
१) Direct object (प्रत्यक्ष कर्म)
२) Indirect object ( अप्रत्यक्ष कर्म)
Active voice चे Passive voice करताना खालील नियम वापरावे लागतात.
१) वाक्याची सुरुवात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्रमाने करावी.
२) वाक्याच्या काळानुरूप सहाय्यक क्रियापद वापरावे.
३) वाक्यातील मूळ क्रियापदाचे धातुसाधित रूप म्हणजेच तिसरे रूप वापरावे.
४) Active voice मधील वाक्यात जर direct व indirect object दिलेले असेल तर कोणतेही एक object passive voice च्या वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे तर दुसरे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरावे.
READ MORE
५) त्यानंतर by हे शब्दयोगी अव्यय वापरावे.
६)’by’ नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरावी परंतु करता जर एखादे विशेष नाम असेल तर तेच नाम जसे आहे तसे लिहावे. उदाहरणार्थ गणेश, मोहन, राधा इत्यादी.
Active voice चे Passive voice करताना विभक्ती मधील बदल पुढील प्रमाणे करावे.
प्रथमl विभक्ती. द्वितीया विभक्ती
I me
We us
You you
He him
She her
It it
They them
Ram Ram
Sita Sita
Examples for better understanding -
Simple present present
I play cricket.
Cricket is played by me.
Shreya sings a song.
A song is sung by Shreya.
We open all the doors.
All the doors are opened by us.
You accept it .
It is accepted by you.
They celebrate eco-friendly Dipavali.
Eco-friendly Dipavali is celebrated by them.
2) Present Continuous tense
1) The Farmers are sowing seeds.
Seeds are being sowed/sown by the farmers.
2) You are repairing a car.
A car is being repaired by you.
3) He is selling insence sticks.
Insence sticks are being sold by him.
4) We are learning lessons.
Lessons are being learnt by us.
5) They are buying cucumbers.
Cucumbers are being bought by them.
3) Present Perfect tense.
I have eaten oranges.
Oranges have been eaten by me.
We have completed our assignment.
Our assignment has been completed by us.
You have sent a message.
A message has been sent by you.
He has played blind man’s buff.
Blind man's buff has been played by him.
She has decorated her rooms.
Her rooms have been decorated by her.
4) Present Perfect Continuous tense
लक्षात ठेवा- मित्रांनो चालू पूर्ण वर्तमान काळाचा passive voice होत नाही.
2) PAST TENSE (भूतकाळ)
Simple past tense
Examples -
Mr. Deshmukh taught us English.
मित्रांनो या वाक्यात दोन कर्म आहेत एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे अप्रत्यक्ष कर्म मग या वाक्याचे passive voice कसे करायचे ते आपण जाणून घेऊया.
English हे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि us हे अप्रत्यक्ष कर्म आहे.
प्रत्यक्ष कर्माने वाक्य passive voice मध्ये करायचे असेल तर-
English was taught to us by Mr. Deshmukh. आणि अप्रत्यक्ष कर्माने दिलेल्या वाक्याचे passive voice करायचे असेल तर-
We were taught English by Mr.Deshmukh.
She paid 50 rupees to the shopkeeper.
The shopkeeper was paid 50 rupees by her . Or
50 rupees were paid to the shopkeeper by her.
Arjun shot the bird's eye.
The bird's eye was shot by Arjun.
Arpita took my sign.
My sign was taken by Arpita.
Someone stole his wallet.
His wallet was stolen by (someone.)
Now, passive voice - without ‘by’
Active चे passive करताना काही वेळा कृती कोणी केली यापेक्षा घडलेली कृती म्हणजेच action महत्त्वाची असते अशा प्रकारच्या वाक्यात by आणि त्यापुढील मूळ करता बऱ्याच वेळा गाळला जातो.
Let's understand the following sentences.-
People speak English all over the world.(A.v)
English is spoken all over the world. (P.v)
Someone has picked my pocket. (A.v.)
My pocket has been picked.
जेव्हा कर्माला महत्व देऊन वाक्य करायचे असते तेव्हा passive voice ची रचना वापरणे अधिक योग्य असते म्हणून passive voice मध्ये पुष्कळ वेळा by आणि by ने जोडला जाणारा करता वापरण्याची आवश्यकता नसते.
खालील passive voice मधील वाक्य काळजीपूर्वक लक्षात घ्या.
Marathi is spoken all over Maharashtra.
Pollution should be stopped.
वरील वाक्यांमध्ये शेवटी by whom हे सांगण्याची गरज नाही परंतु क्रिया कोणाकडून घडली हा पॅसिव्ह वाक्यातील अर्थ पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असेल तर मात्र by + subject वापरावा लागतो. उदाहरणार्थ
Active - Ranjeet Desai wrote the novel ‘Swami’.
Passive - The novel ‘Swami’ was written by Ranjeet Desai. या वाक्यात by Ranjeet Desai असे म्हटल्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही.
Sentences for more practice -
Past Continuous Tense -
She was making a garland.
A garland was being made by her.
We were learning rhymes.
Rhymes were being learnt by us.
Ambika was collecting stamps.
Stamps were being collected by Ambika.
She was drawing a picture.
A picture was being drawn by her.
They were studying English grammar from my website.
- English grammar was being studied from my website by them.
3) past perfect tense (पूर्ण भूतकाळ)
Examples
Liladhar had saved Rs. 25000.
Rs.25000 had been saved by Liladhar.
His younger brother had torn a notebook.
A notebook had been tornby his younger brother.
We had launched ‘Chandrayan’.
‘Chandrayan had been launched by us.
They had arranged a birthday party.
A birthday party had been arranged by them.
Shital had sold red tomatoes.
Red tomatoes had been sold by Shital.
4) Past Perfect Continuous Tense - (चालू पूर्ण भूतकाळ)
लक्षात ठेवा- या काळातील वाक्याचा passive voice होत नाही.
3) FUTURE TENSE. -
SIMPLE FUTURE (साधा भविष्यकाळ)
Examples -
We shall read good thoughts.
Good thoughts will be read by us.
They will use natural colours for ‘Holi’.
Natural colours will be used for ‘Holi’ by them.
He will send an insurance proposal.
An insurance proposal will be sent by him.
Parag will manage it
It will be managed by Parag.
I shall create my own story.
My own story will be created by me.
2) Future Continuous Tense(चालू भविष्यकाळ)
लक्षात ठेवा- या काळातील वाक्याचा passive voice होत नाही.
3) Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)
Examples -
They will have won the match.
The match will have been won by them.
I shall have achieved my goal.
- My goal will have been achieved by me.
We shall have trained a thousand students.
- A thousand students will have been trained by us.
Artificial intelligence will have destroyed human life.
Human life will have been destroyed by artificial intelligence.
We shall have endangered our life due to extra use of artificial intelligence.
Our llife will have been endangered due to extra use of artificial intelligence by us.
4) Future Perfect Continuous Tense (चालू पूर्ण भविष्यकाळ)
लक्षात ठेवा - या काळातील वाक्याचा passive voice होत नाही.
Now, something new
मित्रांनो आपल्या नियमाप्रमाणे आपण passive voice मध्ये कर्त्याच्या द्वितीय विभक्तीपूर्वी by वापरतो परंतु अशी काही क्रियापदे आहेत की त्यानंतर by न वापरता विशिष्ट शब्द येतात त्यातील काही क्रियापदे खाली देत आहेत.
known to
satisfied with
surprised at
contained in
interested in
Examples -
She surprised me.
I was surprised at her.
He knows me.
I am known to him.
The bag contained 5000 rupppes.
5000 rupees were contained in the bag.
IMPERATIVE SENTENCES
(आज्ञार्थी वाक्ये)
मित्रांनो आज्ञार्थी वाक्य मूळ क्रियापदांनी सुरू होतात आणि शेवटी पूर्णविराम दिले जाते त्यांना अज्ञार्थी वाक्य म्हणतात.
आज्ञार्थी वाक्याची रचना- Main verb + object
eg. Write the passage.
Let the passage be written. यावरून आपण passive voice च्या वाक्याची रचना पुढील प्रमाणे लिहू शकतो. Let + object + be + V3
आज्ञार्थी वाक्याचे passive voice करताना खालील नियम वापरावे.
१) वाक्याची सुरुवात Let मे करावी.
२) त्यानंतर वाक्यातील कर्म घ्यावे.
३) कर्मानंतर be वापरून क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे. परंतु वरील वाक्य खालील प्रमाणेही करता येते.
eg. 1) Write the passage.
- You are ordered to write the passage.
2) Turn down the volume.
Let the volume be turned down.
OR You are requested to turn down the volume.
3) Draw the picture.
Let the picture be drawn.
4) Help the needy people.
Let the needy people be helped.
वरील दोन नंबरचे अधोरेखित केलेले वाक्य सोडवल्यानंतर आपणास प्रश्न पडेल की वरील वाक्यात You हा करता दिलेला नाही परंतु आज्ञार्थी वाक्यात तो गृहीत धरावा लागतो कारण समोर व्यक्ती नसेल तर आपण विनंती करू शकत नाही You हे सर्वनाम द्वितीय पुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आहे म्हणून You हाच करता गृहीत धरतात.
वरील प्रकारच्या वाक्याचे पॅसिवाइस करण्यासाठी
१) जर वाक्यात please आलेले असेल तर सर्वप्रथम You हा करता घेऊन You are requested ने वाक्याची सुरुवात करावी.
२) मुख्य क्रियापद to ने जोडावे परंतु यात मुख्य क्रियापदाचे मूळ रूपच कायम ठेवावे.
३) वरील वाक्यातील विनंती दर्शवणारा शब्द पुन्हा लिहू नये.
४) आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर let च्या पुढे not घ्यावे.
Active - Don't sing a song.
Passive - Let not a song be sung.
कधीकधी Active voice मधील वाक्याची सुरुवात it is time to किंवा it was time to ने होते अशा वाक्याचे passive voice करताना खालील नियम वापरावे.
१) Active मधील वाक्याचे सुरुवातीचे it is time पर्यंतचे शब्द सुरुवातीस लिहावेत.
२) त्यानंतर for वापरावे
३) त्यानंतर वाक्यातील कर्म घेऊन त्यापुढे to be व क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे.
eg. 1) Active - It is time to take the medicine.
Passive - It is time for the medicine to be taken.
Active voice मधील वाक्याची सुरुवात जर people say किंवा They say अशी होत असेल तर खालील प्रमाणे त्या ऐवजी it is said वापरावे.
eg. 1) Active - people say that Samarth is brave.
Passive -: it is said that Samarth is brave.
INTERROGATIVE SENTENCES ( प्रश्नार्थक वाक्य)
प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत.
Wh - question. 2) Yes/No type questions किंवा Verbal question.
Wh - question
eg. 1) When did you read the book?
When was the book read by you?
या प्रकारच्या प्रश्नाचे passive voice करताना पुढील नियम वापरावेत.
१) प्रश्नार्थक सर्वनाम जसेच्या तसे ठेवून त्यानंतर वाक्याच्या काळानुसार सहाय्यक क्रियापद घ्यावे परंतु दिलेल्या वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम जर who असेल तर त्याऐवजी By whom लिहावे.
२) त्यानंतर वाक्यातील सहाय्यक क्रियापदातील होणारा बदल तक्त्याप्रमाणे लिहून त्यापुढे कर्म लिहावे व नंतर क्रियापदांचे तिसरे रूप लिहावे.
३) त्यानंतर by लिहून कर्त्याची द्वितीय विभक्ती लिहावी.
Examples -
Who knows it?
By whom is it known?
What did we see there?
What was seen there by us?
2) Yes - No question/ Verbal question.
१) या प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्याचे passive voice करताना खालील नियम वापरावेत.
१) सर्वप्रथम सहाय्यक क्रियापद वापरावे.
२) वाक्यातील कर्म घेऊन त्यानंतर सहाय्यक क्रियापदाचा होणारा बदल लिहावा.
३) क्रियापदाचे धातुसाधित रूप म्हणजेच तिसरे रूप वापरून नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरावी.
Examples - 1) Did he write a book?
Was a book written by him?
2) Do I disturb him?
Is he disturbed by me?
Tags:
