Degrees Of Comparison (Lesson -18)

PREM English ACADEMY
By -CDD
0
Degrees Of Comparison (विशेषणे व त्यांचा तरतमभाव) मित्रांनो, इंग्रजीत आपल्याला तीन डिग्रीज अभ्यासायच्या असतात. 1) Positive Degree (समभाव) 2) Comparative Degree (तरभाव) 3) Superlative Degree ( तमभाव) Positive Degree:- विशेषणाच्या मूळ रूपास समभावदर्शक विशेषणे असे म्हणतात. यात गुणांचे केवळ अस्तित्व दाखवले जाते दोन भिन्न व्यक्तींमध्ये नामांमध्ये किंवा वस्तूंमध्ये एकच गुणधर्म सारख्याच प्रमाणात असतो त्यावेळी त्या गुणधर्माचा सारखेपणा दाखवण्यासाठी पॉझिटिव डिग्री चा उपयोग करतात उदाहरणार्थ Pratik is as tall as Shivam. Positive Degree च्या वाक्यात पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. १) विशेषणाचे मूळ रूप as…..as यामध्ये वापरतात. २) नकारार्थी विधानात विशेषणाचे मूळ रूप बहुदा not so….as यामध्ये वापरतात. या डिग्रीत विशेषणाचे मूळ रूप वापरले जाते उदाहरणार्थ big, clever, tall, beautiful, handsome etc. 2) Comparative Degree:- जेव्हा दोन नामे, सर्वनामे किंवा कृती यातील एकाच गुणधर्माबद्दल तुलना करावयाची असते त्यावेळी हा तर भाव वापरला जातो. एखादा विशिष्ट गुण एखाद्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये दुसऱ्या एखाद्या वस्तू किंवा व्यक्ती पेक्षा कमी किंवा अधिक आहे हे सांगण्यासाठी Comparative Degree चा उपयोग करतात. उदाहरणार्थ - Suraj is cleverer than Manish. कंपरेटीव डिग्री च्या वाक्यात पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. १) विशेषणाला प्रत्यय लावतात परंतु विशेषणाचा उच्चार जर तीन पेक्षा जास्त आघातामध्ये होत असेल तर अशा विशेषणापूर्वी Comparative Degree मध्ये more किंवा less वापरतात. eg. Big bigger, beautiful more beautiful, tall taller २) विशेषणाच्या तर भावा नंतर than हा संबंध दर्शक शब्द वापरतात. eg. Mumbai is bigger than Nashik. Superlative Degree:- जेव्हा दोन पेक्षा अधिक नामे सर्वनामे यांची तुलना करून त्यातील संबंधित एकच नाम किंवा सर्वनाम सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचे असते तेव्हा Superlative Degree चा उपयोग करतात. eg. Shital is the cleverest girl. Superlative degree च्या वाक्यात पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. विशेषणापूर्वी the हे definite article वापरतात. विशेषणाला -est प्रत्यय लावतात परंतु विशेषणाचा बदल जर अनियमित होत असेल तर त्यापूर्वी most वापरतात. डिग्री मध्ये बदल करताना विशेषणामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात १) जर विशेषणाच्या उच्चारात तीन पेक्षा जास्त आघात येत असतील तर त्या विशेषणापूर्वी more किंवा most वापरतात. Positive. comparative. Superlative eg. Beautiful. More beautiful. Most beautiful खालील प्रमाणे विशेषणाचे बदल होतात २) विशेषणाचा उच्चार जर तीन किंवा तीन पेक्षा कमी आघात म्हणजेच (syllable) होत असेल तर अशा विशेषणास comparative - er तर Superlative मध्ये -est प्रत्यय लावतात. Positive Comparative Superlative clever cleverer cleverest tall taller tallest ३) विशेषणाचे शेवटचे अक्षर जर व्यंजन(consonant असेल व त्यापूर्वी जर एखादा स्वर आला असेल तर शेवटचे व्यंजन दोनदा लिहून त्यास -er/est प्रत्यय लावावा. Positive. Comparative. Superlative fat fatter fattest big bigger biggest thin thinner thinnrst ४) विशेषणाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल परंतु त्यापूर्वी जर दोन स्वर आले असतील तर शेवटचे व्यंजन एकदाच लिहून -er/est प्रत्यय लावावा. Positive Comparative Superlative great greater greatest cheap cheaper cheapest sweet sweeter sweetest ५) विशेषणाच्या शेवटी जर y हे अक्षर आले असेल तर त्या ऐवजी i घेऊन -er/ est प्रत्यय लावतात. Positive. Comparative. Superlative busy busier busiest easy easier. easiest ६) काही विशेषणांचे बदल अनियमित होतात. Positive. Comparative. Superlative many. more. most much. more. most good. better. best bad worse. worst far. farther. farthest little. less. least late. later. latest/last ७) ज्या विशेषणाचा उच्चार तीन किंवा तीन पेक्षा जास्त आघातात होतो, त्या विशेषणापूर्वी comparative degree मध्ये more तर Superlative degree मध्ये most प्रत्यय लागतो. Positive. Comparative. Superlative beautiful. more beautiful. most beautiful faithful. more faithful. most faithful Degrees चा बदल करताना तीन प्रकारच्या तुलना असतात. १) एका नामाची दुसऱ्या नामाशी तुलना: यामध्ये एका नामाची तुलना दुसऱ्या एका नामाशी केलेली असते. eg. Chinmay is taller than Sanket. Sanket is not (so) tall as Chinmay. Comparative degree चे Positive degree त रूपांतर करताना खालील नियम वापरावेत. १) than नंतर येणारे नाम किंवा सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. २) त्यानंतर क्रियापद वापरून विशेषणाचे मूळ रूप as……as/ so….as यामध्ये वापरावे. ३) दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे व नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे. ४) वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता म्हणजेच नाम किंवा सर्वनाम शेवटी घ्यावे. Examples - Sandeep is not more curious than Virat. Virat is as curious as Sandeep You are tallar than I. I am not so tall as you. Positive to comparative Positive degree चे Comparative degree त रूपांतर करणे. Rules(नियम):- १) as…...as/not so…as नंतर आलेले नाम किंवा सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. २) त्यानंतर सहाय्यक क्रियापद व मुख्य क्रियापद वापरून दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे. ३) विशेषणास -er प्रत्यय लावावा परंतु विशेषणाचा बदल अनियमित होत असेल तर विशेषणापूर्वी more वापरावे. 4) त्यानंतर than हा संबंध दर्शक शब्द वापरून वाक्याच्या सुरुवातीस आलेले नाम किंवा सर्वनाम शेवटी घ्यावे. Examples: You are not as old as he. He is older or elder than you. You cannot run as fast as I. I can ran faster than you. Comparative to Positive Comparative चे पॉझिटिव्ह करताना पुढील नियम वापरावेत. १) than any other ऐवजी No other घेऊन वाक्याची सुरुवात करावी. २) त्यानंतर कर्त्याच्या वचनाप्रमाणे सहाय्यक किंवा मुख्य क्रियापद वापरून विशेषणाचे मूळरूप as…..as मध्ये वापरावे. Comparative मध्ये आलेला करता शेवटी लिहावा. Examples: Tagore once better than any other poet of his time. No other poet of his time was as good as Tagore. Shivaji Maharaj was more powerful than any other king of Maratha Empire. No other king of Maratha Empire was as powerful as Shivaji Maharaj. Comparative to Superlative Comparative चे superlative करताना खालील नियम वापरावेत. १) Comparative मधील करता व क्रियापद जसेच्या तसे ठेवावे. २) विशेषणापूर्वी the हे उपपद वापरून त्यास -est प्रत्यय लावावा परंतु विशेषणाचा बदल जर अनियमित होत असेल तर विशेषणापूर्वी most वापरावे. ३) त्यानंतर than any other वगळून त्यापुढील वाक्याचा उर्वरित भाग घ्यावा. Examples: Reading is better than any other form of recreation. Reading is the best form of recreation. Mr. Patil is richer than any other man in Yawal. Mr Patil is the richest man in Yawal. The elephant is stronger than any other animal in the forest. The elephant is the strongest animal in the forest. Ashoka was greater than any other king of India. Ashoka was the greatest king of India. Shivaji Maharaj was more powerful than any other king of Maratha Empire. Shivaji Maharaj was the most powerful king of Maratha Empire. एका नामाची काही नामांशी तुलना: या प्रकारात अनेक व्यक्ती व त्यातीलच काही व्यक्ती अशी तुलना केलेली असते अनेकांमध्ये काही जणांची गुणांची श्रेष्ठता दाखवली जाते. Superlative to comparative: Superlative degree चे Comparative degree त रूपांतर करताना खालील नियम वापरावेत. १) वाक्यातील करता व क्रियापद जसेच्या तसे घ्यावे. २) त्यानंतर विशेषनास -er प्रत्यय लावावा परंतु विशेषणाचा बदल जर अनियमित होत असेल तर विशेषणापूर्वी more वापरावे व त्यानंतर than घ्यावे. 3) than most other/many other वापरून उर्वरित वाक्य त्यापुढे लिहावे. Examples: The Ganga is one of the longest rivers in India. The Ganga is longer than many other rivers in India. Tourism is one of the fastest growing industries. Tourism is more fast growing industry than most other industries. Lata is one of the best singers in India. Lata is better than many other singers in India. Hitler was one of the worst dictators. Hitler was worse than many other dictators. Superlative to positive: Superlative degree चे Positive degree करताना खालील नियम वापरावे. १) वाक्याची सुरुवात Very few ने करून विशेषनानंतर आलेले अनेकवचनी नाम त्यापुढे घ्यावे. २) कर्त्याच्या वचनाप्रमाणे सहाय्यक किंवा मुख्य क्रियापद यांचा वापर करावा कारण यामधील करता अनेकवचनी असतो. ३) त्यानंतर विशेषणाचे मूळरूप as….as मध्ये वापरून शेवटी वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता घ्यावा. eg. 1) The Nobel prize is one of the greatest honour in the world. Very few honours in the world are as great as the Nobel Prize. 2) Tourism is one of the fastest-growing industries. Very few industries are as first-growing as tourism.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!