Direct & Indirect Speech (Lesson --19)
By -CDD
August 08, 2025
0
DIRECT AND INDIRECT SPEECH
(प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन)
जेव्हा आपण आपल्या इतरांच्या बाबतीत असणाऱ्या भावना व्यक्त करतो किंवा करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्टच सांगता येत नाही. कधी कधी आपण अप्रत्यक्षरीत्या सुद्धा इतरांच्या बाबतीत बोलतो. व्यक्तीसमोर असताना त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे प्रत्यक्ष कथन व समोर नसताना त्यांच्याविषयी बोललेले त्याला इतरांनी सांगणे म्हणजे अप्रत्यक्ष कथन, अशा प्रकारे कथनाच्या दोन पद्धती आहेत.
१) Direct Speech - (प्रत्यक्ष कथन)
२) Indirect Speech -(अप्रत्यक्ष कथन)
१) Direct Speech - (प्रत्यक्ष कथन):- एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हात लिहितो म्हणजेच एखाद्याचे मूळ बोलणे जसेच्या तसे ठेवणे म्हणजे प्रत्यक्ष कथन होय.
२) Indirect Speech -(अप्रत्यक्ष कथन):- एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करून पण त्याच्या बोलण्याचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजेच अप्रत्यक्ष कथन होय.
सर्वनामातील बदल-
Direct. Indirect
- I me my
He. - him, his
She. - her, her
अवतरण चिन्हातील द्वितीय पुरुषी सर्वनामे reporting verb नंतर येणाऱ्या द्वितीया विभक्ती किंवा नामाप्रमाणे बदलतात.
Reporting verb नंतर Indirect Speech
येणारे नाम किंवा सर्वनाम. करताना होणारे बदल
to me I me my
to him he him his
to her she her her
to you you you your
to us We us our
to them they them their
to Rakesh he him his
to Tina she her her
सहाय्यक क्रियापदातील बदल
Direct. Indirect
am/is. was
are was/were
have/has had
did had+V3
Shall/will should/would
can. could
may might
must. must/had to
ought to. ought to
इतर बदल
Direct. Indirect
this That
these Those
here there
now then
just then
come go
today that day
tomorrow the next day
yesterday the day before
to night. that night
next week. the following week
next month/
year. the following month/year
yet. till then
last night. the previous night
hither. thither
hence thence
thus before
ago. before
काळातील बदल
Direct. Indirect
साधा वर्तमानकाळ. साधा भूतकाळ
चालू वर्तमान काळ. चालू भूतकाळ
पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण भूतकाळ
चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ. पूर्ण भूतकाळ
चालू भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ
सर्वसाधारणपणे वाक्याचे खालील प्रकार आहेत.
Assertive Sentence - विधानार्थी वाक्य
Interrogative Sentence - प्रश्नार्थक वाक्य
Imperative Sentence - आज्ञार्थी वाक्य
Exclamatory Sentence - उद्गारार्थी वाक्य
Optative Sentence - इच्छा दर्शक वाक्य
चला तर मित्रांनो आता आपण वर दिलेल्या वाक्यप्रकारानुसार त्यांचे indirect speech कसे करावे ते समजून घेऊया.
ASSERTIVE SENTENCE
(विधानार्थी वाक्य)
विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना खालील नियम वापरावेत.
१) रिपोर्टिंग व्हर्ब नंतर स्वल्पविराम दिला जात नाही.
२) अवतरणचिन्हे (inverted commas) काढून टाकली जातात.
३) रिपोर्टिंग व्हर्ब नंतर ‘that’ हे conjunction वापरले जाते. (परंतु हे कंजक्शन लिहिताना किंवा बोलताना बऱ्याच वेळा गाळलेही जाते.)
४) जर रिपोर्टिंग verb वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात असेल तर इनडायरेक्ट करताना डायरेक्ट स्पीच मधील काळ बदलावे लागत नाहीत.
eg. 1) Direct- He says,”I am sorry.”
Indirect - He says that he is sorry.
Direct - He will say,” I like the picture.”
Indirect - He will say that he likes the picture.
Example - Vijay Said,” I work hard.”
Vijay said that he worked hard.
Direct speech मध्ये रिपोर्टेड स्पीच मधील वाक्यात कर्त्यानंतर जर सहाय्यक क्रियापद दिले असेल तर केवळ सहाय्यक क्रियापदाचाच भूतकाळ करावा नंतर मुख्य क्रियापदात बदल करू नये मात्र काळा व्यतिरिक्त चे बदल नियमाप्रमाणे करावेत.
eg. Vikas said,” I am very busy today.”
Vikas said that he was very busy that day.
वाक्यात रिपोर्टिंग व्हर्ब नंतर जर टू असेल व रिपोर्टर कोणाला बोलते हे माहिती असेल तर त्या ऐवजी टोल्ड वापरावे इतर सर्व बदल निमाप्रमाणे करावेत.
eg. Avi said to Sanju,” I am not feeling well today.”
Avi told Sanju that he was not feeling well that day.
आता आपण अशी काही वाक्य पाहणार आहोत की ज्याचे रिपोर्टिंग verb भूतकाळात आहे परंतु तरीही रिपोर्टर स्पीच मधील वाक्याच्या काळात बदल होत नाही ही वाक्ये म्हणजेच काही सत्य होत.
१) रिपोर्टेड स्पीच मधील वाक्य जर एखादी म्हण असेल तर -
eg. Aarya said,”Honesty is the best policy.”
Arya said that honesty is the best policy.
2) त्रिकाल बाधित सत्य घटना असेल तर…
eg. 1)The teacher said,” the Earth is round.”
TheTeacher said that the Earth is round.
2) The teacher said,”Two and Two Makes four.”
Teacher said that two and two makes four.
ऐतिहासिक सत्य असेल तर-
eg. Radha said,”India became free in 1947.”
Radha said that India became free in 1947.
विज्ञानाचा नियम असेल तर-
eg. Newton said,”For every action there is an equal & oppsite reaction.”
Newton said that for every action there is an equal and opposite reaction.
सवयीचे (habit) सत्य असेल तर-
eg. He said,”I am an early riser.”
He said that he is an early riser.
भूतकाळातील घटना असतील तर त्याचा काळ बदलू नये.
eg. Prem said,”The teacher was teaching and students were learning.”
Prem said that the teacher was teaching and students were learning.
Reported speech मधील वाक्य जर साध्या भूतकाळात असेल व ते ठराविक वेळ किंवा काळ दर्शवत असेल तर त्याचा काळ बदलू नये.
eg. Santosh said,”when I lived in Mumbai I often met Bhushan.”
Santosh said that when he lived in Mumbai he often met Bhushan.
More examples for more practice -
1) Priya said,” I needn't study.”
Priya said that she did not have to study.
2) He said,”He was doing it.”
He said that he had been doing it.
3) She said,” I bought this pen only yesterday.”
She said that she had bought that pen only the day before.
2) Interrogative sentence
(प्रश्नार्थक वाक्य)
प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत.
Yes/No type questions/ Verbal questions
Wh-question
Yes/No question/ Verbal question -
या प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात सहाय्यक क्रियापदाने होते. या प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना खालील नियम वापरावे.
Rule(नियम)- १) रिपोर्टिंग व्हर्ब- asked वापरावे.
2) अवतरण चिन्हे काढून त्याऐवजी if किंवा whether घ्यावे.
३) Reported Speech मधील वाक्याची रचना Subject + verb + object अशी करून काळाचे व इतर बदल नियमाप्रमाणे करावे.
Examples -
Ranjeet said to Ranjan,”Are you going to Bhusawal?”
Ranjeet asked Ranjan if he was going to Bhusawal.
“Are you ready?” His brother asked.
His brother asked if he was ready.
2) Wh - question
या प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना पुढील नियम वापरावे.
१) Said किंवा said to च्या ऐवजी asked वापरावे.
२) प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नार्थक सर्वनामने होईल तेच प्रश्नार्थक सर्वनाम connective म्हणून वापरावे.
रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याचे रूपांतर साध्या वाक्यात म्हणजे subject + verb + object किंवा कॉम्प्लिमेंट असे करावे व नियमाप्रमाणे काळाचे इतर बदल करावे.
टीप- इनडायरेक्ट स्पीच नंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरू नये, त्याऐवजी पूर्णविराम वापरावा.
eg. He said to Shirish,”where are you going?”
He asked Shirish where he was going.
More examples for more practice
“Why don't you go there teacher?” he asked me.
He asked me why I didn't go there.
The teacher angrily said, "why have you not finished your homework?”
The teacher angrily asked why I had not finished my homework.
The boy asked,”which bus I should take for Jalgaon?”
The boy enquired which bus he should take for Jalgaon.
I said to Vishal,” what does it mean?”
I asked Vishal what it meant.
“What were you revising?” He asked.
He asked what he had been revising.
3) Imperative Sentence
(आज्ञार्थी वाक्य)
आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना खालील नियम वापरावे.
१) रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या भावार्थानुसार रिपोर्टिंग व्हर्ब घ्यावे.
वाक्याचा भावार्थ जर प्रकट होत नसेल तर अशावेळी रिपोर्टिंग व्हर्ब asked किंवा told वापरावे. वाक्याच्या भावार्थानुसार ordered, requested, suggested, warned, advised, commanded वापरावे.
2) reported speech मधील वाक्य रिपोर्टिंग व्हर्ब नंतर to ने जोडावे.
३) दिलेल्या वाक्याच्या काळात बदल करू नये.
Examples -
My friend said to me,”come at 7 o'clock.”
My friend suggested me to come at 7 o'clock.
Hari said to Madhav,” Don't run after quick money.”
Hari advised Madhav not to run after quick money.
The Doctor said to the patient,”Take bed rest for a week.”
The Doctor advised the patient to take bed rest for a week.
The secretary said,” Hello, I am Pankaj.”
The secretary greeted him and introduced himself as Pankaj.
Maya said, “Gita, happy birthday!”
Maya wished Geeta a happy birthday
नकारार्थी अज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना Don't हे शब्द काढून टाकावेत व त्या ऐवजी not to हे शब्द घ्यावेत व इतर नियम वापरावेत.
eg. The teacher said to the boys, “Don't make a noise.”
The teacher warned the boys not to make a noise.
आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जर Let's या शब्दाने झाली असेल तर त्याची इनडायरेक्ट स्पीच करताना-
१) proposed to किंवा suggested to यापैकी योग्य ते रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे. परंतु बोलणारी व्यक्ती एकटीच असेल तर
Proposed/ suggested वापरावे.
२) अवतरण चिन्हे काढून that हे connective वापरावे.
३) Let’s म्हणजेच we shall या ऐवजी they should लिहून उर्वरित वाक्य त्यापुढे लिहावे.
Examples -
Pratik said to Yash,” Let's have a cup of tea.”
Pratik suggested to Yash that they should have a cup of tea.
2) “Let's visit the temple,” he said to his friends.
He Suggested to his friends that they should visit the temple.
Let's (Let us) या रचनेचा उपयोग बहुदा सूचना म्हणजे suggestion करण्यासाठीच केला जातो. बोलणारा मनुष्य ज्यांना उद्देशून बोलतो त्यांना काहीतरी करण्याची सूचना करीत असतो आणि त्यात तो स्वतःचाही समावेश करतो. अशा वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना suggested हे reporting verb वापरणे योग्य ठरते. या क्रियापदानंतर तू हा शब्द वापरून नंतर ज्यांना सूचना केली असेल त्यांचा उल्लेख करावा लागतो त्यानंतर हे कंजक्शन वापरून व मग they हा करता घेऊन should सह रचना करावी लागते.
Let me/him- डायरेक्ट स्पीच मध्ये Let me किंवा him इत्यादी शब्दांचा उपयोग असतो तेव्हा -
eg. 1) I said,”Let him come with us, mother.
I asked mother to let him come with us.
Mother said to Hari, “Let Manoj have his own way.”
Mother told Hari to let Manoj have his own way.
वरील प्रकारच्या वाक्यात let चा अर्थ allowed to असा आहे.
eg. Let me go= Allow me to go. म्हणजे लेट नंतर येणारा go हा शब्द verb नसून infinitive without to आहे. म्हणून Let Manoj haveचे indirect करताना to let Manoj have असे करावे लागले.( to let Manoj hadअसे होत नाही.)
4) Exclamatory sentence
( उद्गारार्थी वाक्य)
उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना
१) Said किंवा said to च्या ऐवजी exclaimed वापरावे.
२) स्वल्पविराम व अवतरण चिन्ह ऐवजी that वापरावे.
३) उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य करून विधानार्थी वाक्याचे indirect करतानाचे नियम वापरावेत.
eg. Ankita said,”What a beautiful scene it is!”
Ankita exclaimed that it was a very beautiful scene.
कधी कधी विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीस एखादा उद्गारवाचक शब्द दिला असतो, त्यामुळे अशा वाक्यातून वेगवेगळ्या भावनांचा बोध होतो खालील तक्त्यावरून त्या वाक्यात वापरलेला शब्द कोणते भाव व्यक्त करतो ते दिले आहे व त्यासाठी कोणते रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे हेही दिलेले आहे.
Hurrah! - exclaimed with joy
Sorry!. - exclaimed with regret
How! - exclaimed with surprise
What! - exclaimed with surprise
Bravo! - applauded
Ouch! - exclaimed with pain
Alas! - exclaimed with sorrow
Pooh! - exclaimed with contempt
Examples -
They said,”Hurrah! We have won the match.”
They exclaimed with joy that they had won the match.
The teacher said to the boys,” Bravo! you played bravely.”
The teacher applauded the boys that they had played bravely.
5) Optative Sentence
(इच्छादर्शक वाक्य)
हे वाक्य स्वागतासाठी निरोपासाठी मनातील सुप्त इच्छा व्यक्त करण्यासाठी वापरली जातात यामधील वाक्यरचना नियमानुसार नसतात त्यामुळे अशा वाक्याचे इन डायरेक्ट करताना खालील नियमांचा विचार करावा.
१) यात Said toऐवजी wished वापरावे. कधी कधी said to च्या ऐवजी bade(निरोप घेणे) वापरावे.
२) दिलेल्या रिपोर्टिंग स्पीच मधील वाक्यात जर क्रियापद दिलेले असेल तर तेच क्रियापद वाक्याच्या काळानुरूप रिपोर्टिंग verb म्हणून वापरावे.
eg. 1) He said to me,”Good morning!”
He wished me good morning.
2) He said,”Good bye, friends!”
He bade his friend.
नकारार्थी हुकूम असल्यास forbade from + verb + ing वापरावे.
eg. He said,”Don't speak.”
He forbade from speaking.
Tags:
