Question Tag (Lesson -9)

PREM English ACADEMY
By -CDD
0
Question Tag (Tail Tag):- क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त किंवा लहान प्रश्न. एखादे विधान केल्यानंतर ऐकणाऱ्या कडून ‘होय’ असा प्रतिसाद मिळवण्याकरिता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि तो विधानार्थी वाक्याला जोडला जातो उदाहरणार्थ He is very kind. हे विधान आहे त्याला क्वेश्चन टॅग जोडायचा असल्यास पुढील प्रमाणे जोडला जातो. आपण केलेल्या विधानास किंवा आज्ञेस पुष्टी देण्यासाठी क्वेश्चन टॅग चा वापर करतात. He is very kind, isn't he? चला तर मित्रांनो आता आपण क्वेश्चन टॅग कसा जोडावा याबाबतचे नियम जाणून घेऊया. Rule( नियम):- 1) दिलेल्या वाक्यात सहाय्यक क्रियापद असल्यास क्वेश्चन टॅग मध्ये प्रथम सहाय्यक क्रियापद त्याला जोडून not आणि त्यापुढे कर्त्याच्या जागी सर्वनाम घ्यावे. 2) दिलेल्या वाक्यात सहाय्यक क्रियापद नसल्यास क्वेश्चन टॅग करताना साधा वर्तमान काळ असेल तर doesn't किंवा don't चा वापर करतात व साधा भूतकाळ असेल तर didn't चा उपयोग करतात. 3) दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. 4) वाक्याच्या शेवटी comma(स्वल्पविराम) देऊन क्वेश्चन टॅग जोडतात. 5) नकारार्थी विधाने बहुदा no, not, never, nothing या शब्दांनी व्यक्त होतात त्यांचे क्वेश्चन टॅग् होकारार्थी लिहावे लागतात हे लक्षात ठेवावे. 6) वाक्यात I am असे होकारार्थी करता, क्रियापद आल्यास aren't I ?असा क्वेश्चन टॅग वापरतात. I am not असे नकारार्थी मूळ वाक्य असल्यास am I? असा क्वेश्चन टॅग वापरतात. 7) आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग will you? असा वापरतात. 8) Let’s ने सुरु होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी shall we? असा लिहिला जातो. 9) विधानार्थी वाक्यात everyone, everybody, anyone, anybody, nobody, somebody, noone इत्यादी सर्वनामांसाठी they हे सर्वनाम क्वेश्चन टॅग मध्ये वापरावे लागते. 10) वाक्याच्या सुरुवातीस ‘There’ चा उपयोग केला असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये there हाच शब्द वापरावा लागतो. Examples for Practice - We live in an age of rapid globalisation. We live in an age of rapid globalisation, don't we? It was his bad luck. It was his bad luck, wasn’t it. My friends were singing the songs. My friends were singing the songs, weren’t they? I should recite the rules of question tag for better understanding. I should recite the rules of question tag for better understanding, shouldn't I? Let's play cricket. Let's play cricket, shall we? Change the voice. Change the voice, will you? I used to play chess. I used to play chess, didn't I? He bought a pen and a pencil. He bought a pen and a pencil, didn't he? The sun shines very brightly. The Sun shines very brightly, doesn't she? Air pollution has been a major concern. Air pollution has been a major concern, hasn't it?
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!