सुविचार
By -CDD
August 10, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) डोळे तर जन्मत: मिळालेले असतात. कमवायची असते ती 'नजर' चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची 'पारखी नजर'...!*_
_*2) चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काहीच नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे...!*_
_*3) महत्व माणसाला नसतं तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकत तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा जिंकू शकत नाही...!*_
_*4) समोरचा आपली चूक समजावून सांगत असेल, आणि आपल्याला जर ती समजत असेल तर समजायचं की समज आली..! प्रत्येकदा वेळ चूकीची असते, असं नाही. बऱ्याचदा कुठं तरी आपणच चुकलेले असतो...!*_
_*5) सांगावे त्यालाच जो कुणाला सांगणार नाही, मागावे त्यांच्याकडेच जो देईल स्वखुशीने, आवडून घ्यावे तेच जे मिळालं आहे नशिबाने, आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थी मनाने...!*_
Tags:
