सुविचार
By -CDD
August 10, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) जिथे आपल्याला ठेच लागते, तिथूनच सांभाळून चालायची सवय लागते... मग ती पायाला असो किंवा मनाला...!*_
_*2) माणसाच्या कातड्याचा रंग कोणताही असू द्या, पण आतड्याचा रंग हा माणुसकीचाच असावा...!*_
_*3) प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी मनात मात्र काय आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही...!*_
_*4) अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे आहेत एक "स्वाभिमान" व दुसरा "गर्व" अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा "कर्तृत्व" जन्माला येते.. आणि अहंकाराचे रूपांतर जेव्हा गर्वात होते तेव्हा ते "विनाशाला" निमंत्रण देते...!*_
_*5) आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं, त्याला नशीब म्हणतात... सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात... आणि थोडे कमी असूनही आनंद देतं, त्याला आयुष्य म्हणतात...!*_
Tags:
