सुविचार
By -CDD
August 14, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवत नसतात...!*_
_*2) जिथे आपण ठेच लागून पडतो, तिथुनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते...!*_
_*3) सुख - दुःखात जास्त अंतर नसते, जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्विकारत नाही ते दुःख...!*_
_*4) भांडण करणाऱ्या माणसांपेक्षा भांडण लावणाऱ्या माणसांपासून सावध रहा... कारण भांडण करणारी माणसं ओळखता येतात पण भांडणं लावणारी माणसं ओळखता येत नाही...!*_
_*5) लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला...! जर तुम्ही ऐकायला शिकलात तर तुम्ही सहन करायला शिकाल आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल...!*_
Tags:
