सुविचार
By -CDD
August 14, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही...!*_
_*2) शिक्षणातून व कुटुंबातून घेतलेले ज्ञान मनुष्य कदाचित विसरेलही.. परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेले धडे तो कधीच विसरत नाही...!*_
_*3) जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपली जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच आपली नसतात...!*_
_*1) आयुष्यात खेळ कोणताही खेळा पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणी बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून खेळा कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते...!*_
_*5) सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नाही, रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो...!*_
Tags:
