सुविचार
By -CDD
August 01, 2026
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) जगायचं तर सुतळी बॉम्ब सारखं जगा ! वाजेल की नाही माहीत नाही परंतु विझेपर्यंत कोणी जवळ येण्याची हिंमत करणार नाही...!*_
_*2) आपली संगत हेच आपले भविष्य घडवत असते आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे...!*_
_*3) विषय शून्याचा असो नाही तर, अनंताचा स्वाभिमानापुढे, काहीच नाही...!*_
_*4) मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थनाच करणाराच असतो...! काही काही सत्कर्म अशीही करावीत की, ज्याचा साक्षीदार देवा शिवाय दुसरा कोणीच नसावा...!*_
_*5) ५ सेकंदाच्या छोट्याशा हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर जरा विचार करून पहा, नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल...!*_
Tags:
