सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसांत नसतात...!*_
_*2) "विश्वास" असेल तर चुकीच्या शब्दाचाही "योग्य" अर्थ काढला जातो पण "विश्वासच नसेल" तर चांगल्या शब्दाचा "चुकीचा" अर्थ काढला जातो...!*_
_*3) बुध्दीच्या जोरावर "श्रीमंत" होता येतं पण श्रीमंतीच्या जोरावर "बुद्धीमान" होता येत नाही...!*_
_*4) स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो...!*_
_*5) सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते, चांगले विचार हे नेहमी चांगल्या विचार असणा-या माणसांच्या संगतीतून येतात, आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की मी चांगले विचार असणा-या लोकांच्या संगतीत आहे...!*_
Tags:
