सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) सुई, धागा हरवला नाही पण, हल्ली कोणी तो मागतही नाही, कारण आज काल फाटलेली नाती आणि वस्तू शिवायची गरज कोणालाही वाटत नाही...!*_
_*2) राग मनात ठेवून गोड बोलण्याऱ्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं कधीही चांगलीच...!*_
_*3) तोंडात गोड आणि मनात खोड असलेली माणसं कधी घात करतील हे सांगता येत नाही...!*_
_*4) आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, हे तुमच्या स्वभावावर अवलंबून असते. तुम्ही दुसर्याचा पराभव झाला, दुसर्याचे नुकसान झाले म्हणून आनंदी असाल तर ती विकृती आहे. इतरांच्या प्रगतीने, यशाने आनंदी असाल तर तो आनंद निखळ आनंंद आहे. तुम्ही किती आनंदी आहात याबरोबरच, तुमच्यामुळे इतर जन किती आनंदात आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे.*_
Tags:
