सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आई बापाची सेवा करत असतांना देवाला सुद्धा विटेवर उभा रहावं लागतं...!*_ _*2) निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसंही भेटत जातात...!*_ _*3) सुंदर नसलेली व्यक्ती एखाद्याचे आयुष्य सुंदर बनवू शकते, आणि सुंदर दिसणारी व्यक्ती एखाद्याचे आयुष्य बिघडवू शकते म्हणून चेहरा नको स्वभाव बघा...!*_ _*4) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असत. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात...!*_ _*5) लहानपणी प्रवासात झाडं मागं पळत असल्याचा भास व्हायचा.. हल्ली सुखाच्या बाबतीत तसं होत राहतं... वास्तविक दोन्हीही तिथंच असतात, धावत फक्त आपण असतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!