Assertive & Exclamatory sen.(lesson-13)
By -CDD
August 08, 2025
0
Assertive and Exclamatory sentences
(विधानार्थी आणि उद्गारार्थी वाक्ये)
Dear friends today we are going to learn about assertive and exclamatory sentences.
मित्रांनो आज आपण विधानार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. तसेच विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य बनवताना कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. चला तर मग.
Assertive Sentence:- (विधानार्थी वाक्य) ज्या वाक्यांची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम दिला जातो त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.
Exclamatory Sentence:- (उद्गारार्थी वाक्य) ज्या वाक्यांची सुरुवात How किंवा What ने होते व शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले जाते त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
दिलेल्या विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य तयार करताना पुढील नियमांचा उपयोग करावा.
Rules(नियम) :- १) वाक्याची सुरुवात नियमाप्रमाणे What किंवा How ने करावी.
२) दिलेल्या वाक्यात विशेषनानंतर जर नाम येत असेल तर What ने वाक्याची सुरुवात करावी आणि विशेषनानंतर जर नाम येत नसेल तर How ने करावी. किंवा
वाक्यात a / an article आलेले असेल तर अशावेळी वाक्याची सुरुवात What ने करावी.
३) वाक्यातील विशेषण लिहून त्यानंतर करता लिहावा.
४) त्यानंतर क्रियापद लिहून त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह लिहावे.
५) वाक्यात अधिक्य दर्शवणारे शब्द very, extremely, greatly, immensely हे शब्द काढून टाकावेत.
Structure
How + adjective /adverb + subject verb!
eg. 1) How clever he is!
2)How sweetly She sings!
2) What + article(a/an) + adjective + noun + sub + verb + !
eg. 1) What a clever boy he is!
What a beautiful idea it is!
Sentences for Practice -
You are a very brave girl.
What a brave girl you are!
Advertising is very necessary in the case of new products.
How necessary advertising is in the case of new products!
He was very thirsty.
How thirsty he was!
It is very expensive.
How expensive it is!
This is a very strange request.
What a strange request this is!
दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य तयार करताना पुढील नियमांचा उपयोग करावा.
Rules(नियम) - १) प्रथम How किंवा/ What हे शब्द काढून त्याऐवजी वाक्याच्या सुरुवातीस करता लिहावा.
२) वाक्यातील क्रियापद लिहून How किंवा What ऐवजी वाक्यातील भाव टिकवण्यासाठी विधानात very, extremely, greatly, exceedingly यासारख्या शब्दांचा उपयोग करावा.
३) त्यानंतर विशेषण लिहून दिलेल्या वाक्यात नाम असेल तर त्यापुढे लिहावे आणि शेवटी पूर्णविराम द्यावा.
Sentences for practice
1) How simple it is!
- It is very simple.
2) What a stupid boy!
- He is a very stupid boy.
3) What a stroke!
- It is a wonderful stroke.
4) How timid these girls are!
- These girls are very timid.
5) What a beautiful flower it is!
- It is a very beautiful flower.
Tags:
