सुविचार
By -CDD
August 08, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.. चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात...!*_
_*2) कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते..*_
_*3) सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नाही, रडणारा महालात ही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो...!*_
_*4) दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते...!*_
_*5) खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो...!भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रध्दा लागते, माणूस कळायला माणूसकी लागते, चांगल जगायला सुंदर विचार आवश्यक असतात आणि भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागते…!!*_
Tags:
