सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) कुठलं ही नातं एकतर्फी असून चालत नाही ते दोन्ही बाजूने असावं लागत आपण रोज भाकरी खातो ति जर एकाच बाजूने भाजली तर ती कुणाच पोट भरु शकत नाही तिला सुध्दा दोन्ही बाजूने भाजावं लागतं नात्याचही असच असतं...!*_ _*2) मोठे होऊन खुजे होण्यापेक्षा लहान राहून अभिमानास्पद जगलेले कधीही श्रेष्ठ...!*_ _*3) प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे...!*_ _*4) लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते, म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे...!*_ _*5) संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. स्वाभिमान आणि हिंमत या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. त्या रक्तात असाव्या लागतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!