सुविचार
By -CDD
August 08, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे आपले विचार. कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची ताकद त्यात असते.*_
_*2) समोरची व्यक्ती आपलीच आहे, अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा नात्यातली ओढ कायम राहते...!!*_
_*3) ज्यांना जिंकायच असत ते कधीच दुसऱ्यांना हरवण्याची तयारी करत नाहीत... त्यांना फक्त त्यांच्या स्वतः केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं...!*_
_*4) थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या. पण पराभव मानून कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाच आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेल सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेल प्रत्युत्तर असते...!*_
_*5) बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं, परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही. जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तीमत्त्व तयार करतं...!*_
Tags:
