CLAUSES(Part - 1)

PREM English ACADEMY
By -CDD
0
CLAUSES (उपवाक्ये) Clause - a group of words a part of sentence with only one main verb in it is called a ‘clause’ 12th English Batch is going to start soon, PREM ENGLISH ACADEMY,YAWAL एखाद्या वाक्याचा भाग म्हणून वापरला जाणारा शब्दसमूह ज्यात करता(subject)व एक मुख्य क्रियापद असते. कोणताही clause हा क्रियापदा शिवाय असू शकत नाही तसेच एकापेक्षा जास्त मुख्य क्रियापदांचाही असत नाही त्यामुळे क्रियापदावरून आपणास दिलेल्या clause ची संख्या लक्षात येऊ शकते. उदाहरणार्थ - 1) when he came I asked where he was. कोणत्याही वाक्यातील clausesची संख्या माहित करून घेण्यासाठी सर्वप्रथम वाक्यात वापरल्या जाणाऱ्या मुख्य क्रियापदांची संख्या काढावी क्रियापदांच्या संख्ये इतकेच clauses त्या वाक्यात असतात. वरील वाक्यात तीन क्रियापदे आहेत came, asked & was म्हणजेच या वाक्यातील clauses ची संख्या तीन आहे. किंवा clauses ची संख्या काढण्यासाठी दुसरी पद्धत वापरता येते. प्रत्येक subordinate clause ची सुरुवात बहुदा ही connective ने होत असते. कधी कधी without connective ने सुद्धा subordinate clause ची सुरुवात होते. eg. 1) when he came I asked where he was. वरील वाक्यात दोन connective आले आहेत. व एक clause आहे. Clause चे मुख्य दोन प्रकार आहेत. Main Clause - मुख्य वाक्यांश Subordinate clause - उप वाक्यांश दिलेल्या clauses मध्ये main Clause कोणता व subordinate clause कोणता हे ओळखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. When he came I asked a question. कोणत्याही वाक्यातील main Clause ओळखण्यासाठी त्या वाक्यात असणाऱ्या वाक्यांचा अर्थ पहावा. कारण Main clause चा अर्थ समजण्यासाठी आपणास इतर clauses च्या अर्थाचा संदर्भ घ्यावा लागत नाही; परंतु subordinate clause चा अर्थ समजण्यासाठी आपणास Main clause च्या अर्थाचा संदर्भ घ्यावा लागतो. जसे वरील वाक्यात when he came जेव्हा तो आला, कोण आला, काय झाले ते समजत नाही, परंतु पुढील clause चा संदर्भ घेतला तर त्याचा अर्थ समजतो. याउलट I asked a question या clause चा पूर्ण अर्थबोध आपणास होतो. मी एक प्रश्न विचारला म्हणजे Main clause चा अर्थबोध फक्त त्याच clause वरून होतो. इतर वाक्याचा संदर्भ घ्यावा लागत नाही म्हणून वरील वाक्यात when he came हा subordinate clause आहे, तर I asked a question हा Main clause आहे. तसेच subordinate clause ओळखण्यासाठी वेगळी पद्धत आहे. ती अशी की ज्या clause ची सुरुवात एखाद्या connective ने होते, तो subordinate clause असतो तर ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, तो Main clause परंतु कधीकधी subordinate clause ची सुरुवात ही कर्त्याने होते. म्हणून वरील दोन्ही पद्धती लक्षात ठेवाव्यात. When he came I asked a question. वरील वाक्यात कर्त्याने सुरू होणारा clause हा I asked a question हा आहे म्हणून तो Main clause तर connective ने सुरु होणारा हा clause when he came आहे म्हणून तो subordinate clause होय. अशाप्रकारे Clause चे मुख्य प्रकार दोन आहेत. Main-clause चे काही प्रकार नाहीत. मात्र subordinate clause चे तीन प्रकार आहेत. Noun clause - नामाचे काम करणारा वाक्यांश Adjective clause - विशेषणाचे काम करणारा वाक्यांश Adverb clause - क्रियाविशेषणाचे काम करणारा वाक्यांश. You may like: https://premenglishacademy.blogspot.com/2024/04/wh-question.html NOUN CLAUSE दिलेल्या अनेक clause मध्ये जो clause त्या वाक्याच्या नामाचे कार्य करतो त्यास Noun clause असे म्हणतात. Noun clause हा subordinate clause चा एक प्रकार असल्यामुळे या clause ची सुरुवात when, that, what, whatever, where, how, etc. यासारख्या Subordinating conjunction ने होते. आपणास दिलेल्या वाक्यातील वेगवेगळ्या clause पैकी Noun clause ओळखणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही वाक्यातील Noun clause ओळखण्यासाठी त्या clause च्या ऐवजी एखादे नाम वापरून पहावे किंवा something वापरून पहावे. जर हे वापरून वाक्यरचनेतून काही अर्थ निघत असेल व वाक्यरचना अचूक वाटत असेल तर तो Noun clause आहे असे समजावे. eg. He told that he was ready. या वाक्यातील subordinate clause ऐवजी एखादे नाम किंवा something वापरून पहावे. He told the story. / He told something. दोन्ही प्रकारात वाक्याचा अर्थ बोध होतो व वाक्यरचना ही अचूक आहे म्हणून that he was ready हा Noun clause आहे. What he said is true. (The news is true.) This is what I want. (This is the fact.) अशाप्रकारे वाक्यातील Noun clause शोधावा. Noun - clause चे प्रकार खालील प्रमाणे Subject of the verb Object of the verb Complement of the verb Adjective complement Object of the preposition Ine opposition to noun or pronoun Object of the gerund Object of the participle Object of the infinitive चला तर मग, आता या नऊ प्रकारांविषयी एकेक करून सविस्तर समजून घेऊया. 1) Noun clause as subject of the verb:- eg. 1) What he said was right. Was right - Main clause What he said - Noun clause as subject of the verb ‘was’ 2) When the monsoon will start is not known. 3) Why he came late was a mystery 4) What we do today will shape our fortune. 5) How he will write is unknown. 6) When the students will study hard is uncertain. वरील वाक्यांमध्ये अधोरेखित clauses हे Noun clause as subject of the verb आहेत. 2) Noun clause as object of the verb:- या प्रकारात noun clause हा main Clause मधील क्रियापदाचे कर्म म्हणून काम करतो म्हणून या clause ला Noun clause as object of the verb असे म्हणतात. He told that he was ready. He told - Main clause that he was ready - noun clause as object of the verb ‘told’ या वाक्यात that he was ready या noun clause चे कार्य told या क्रियापदाचे कर्म म्हणून आहे. eg. 1) I said that it was memorable incident. Tell our friends that we have completed the work. वरील वाक्यातील अधोरेखित clause. हा Noun clause as object of the verb आहे. eg. 3) Do you believe that God has given us hands and feet? 4) I suspect that they are highway-men. 5) Asma doesn't know what they are doing. Noun clause as complement of the verb:- प्रथम दिलेल्या वाक्यातील पूरक शब्द म्हणजेच complement कसे ओळखावे हे पाहणे महत्त्वाचे आहे ते खालील प्रमाणे . She was sick या वाक्यात sick हा शब्द was या क्रियापदाचे कॉम्प्लिमेंट म्हणून कार्य करत आहे. कारण ज्यावेळी to be चे सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून वाक्यात काम करते. अशावेळी त्या क्रियापदा नंतर वाक्यात कॉम्प्लिमेंट येते व ज्यावेळी एखादे अकर्मक क्रियापद वाक्यात येते. त्यानंतर कॉम्प्लिमेंट येते. अकर्मक क्रियापदे eg. happen, dance, climb, roar, flow,go come, become, seem, go इत्यादी. ज्यावेळी एखादा noun clause वाक्यातील क्रियापदाचे complement (पूरक शब्द) म्हणून काम करतो. अशावेळी तो Noun clause as complement of the verb असतो. This is what I want. या वाक्यात इज हे सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून काम करत आहे व म्हणून त्यानंतर येणारा noun clause हा त्याचे complement म्हणून काम करत आहे. This is - main Clause. ‘what I want ‘ noun clause as complement of the verb ‘is’ तसेच खालील अकर्मक क्रियापदानंतरही येणारा noun clause हा complement of the verb असतो. appear, wish, look, remember, seem, stand, go, come, become etc. eg. 1) lt seems that he will not come. 2) She saw that Pratik was playing well. Noun clause as adjective complement - जेव्हा एखादा Noun clause हा क्रियापदाचे ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो तेव्हा तो Noun clause as adjective complement असतो. eg. I am sure that he won't say no. या वाक्यात I am sure हा main Clause आहे. Noun clause ‘sure’ या ऍडजेक्टिव्ह चे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करत आहे म्हणून that he won't say no हा Noun clause as adjective complement आहे. eg. 1) The shopkeeper was sure that Pratibha would not break her bangles. या वाक्यात Noun clause sure या adjective चे कॉम्प्लिमेंट आहे. इंग्रजीत काही adjectives अशी आहेत की, ज्यानंतर बहुदा Noun clause हे कॉम्प्लिमेंट म्हणूनच काम करतात. जसे doubtful, suspicious, sure, certain, afraid etc. 2) I am now certain that grammar is not so difficult. 3) I am sure that you know the answer. Noun clause as object of the preposition:- या प्रकारात वाक्यातील Noun clause हा त्याच वाक्यातील main Clause च्या शेवटी येणाऱ्या preposition चे object म्हणून काम करतो. eg. 1) Gagan laughed at what I said. Gagan laughed at - Main clause. What I said हा noun clause as object of the preposition at आहे. या प्रकारात बहुदा main Clause च्या शेवटी preposition येते व त्याला लागूनच Noun clause सुरू होतो. eg. 1) I do not believ in what he speaks. 2) He thought of what he was doing. 3) Take advice from whomever you meet. Noun clause as case in opposition to noun or pronoun: जो नवीन क्लोज मुख्य वाक्यातील नाम किंवा सरनामाच्या क्रियेचा अर्थ स्पष्ट करतो त्यास Noun clause asi in opposition to noun or pronoun असे म्हणतात. बहुदा या clause पूर्वी sure certain PT necessary wonder afraid belief good bad fear हे शब्द येतात व that ने या clause ची सुरुवात होते. eg.1) it is true that he is guilty. It is true - main Clause. that he is guilty - Noun clause as case in apposition to ‘it’. 2) it was soon clear that he had an inborn skill. 3) it is necessary that every child should be vaccinated. Noun clause as object of the gerund - जर जरंड म्हणजे क्रियापदास आयएनजी प्रत्यय लावला जातो. रनिंग हे क्रियापदाचे आयएनजी लावलेले रूप आहे परंतु हे रनिंग क्रियापदाचे काम न करता जेव्हा नामाचे कार्यकर्ते त्यावेळी ते जेरंड असते. Running is a good exercise या वाक्यात रनिंग हे कर्त्याचे काम करत आहे. जेव्हा एखादा नाऊन क्लोज वाक्यातील Gerundचे कर्म म्हणून काम करतो तेव्हा तो clause हा ‘Noun clause as object of the Gerund असतो. eg.1) Knowing that he was guilty I was angry. Knowing I was angry - main clause. that that he was guilty - Noun clause as object of the gerund knowing. 2) Learning that Suresh was poor, I helped him. 3) Suggesting that her husband was dead the doctor went away. Noun clause as object of the participle - eg. I saw him running. जेव्हा एखाद्या क्रियापदास ing प्रत्यय लावून ते क्रियापद वाक्यात विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास participle असे म्हणतात. ज्यावेळी एखादा नाऊन क्लोज वाक्यातील पार्टिसिपलचे कर्म म्हणून काम करतो अशावेळी तो noun clause as object of the participle असतो. एखाद्या क्रियेचा अर्थ, महत्व स्पष्ट झाल्यानंतर त्या क्रियेच्या समर्थनार्थ किंवा निषेधार्थ दुसरी क्रिया केली जाते तेव्हा या clause चा वापर करतात. eg. 1) I heard him speaking what he knew. I heard him speaking - main Clause. What he knew - noun clause as object of the participle speaking. 2) I found him speaking which was wrong. Noun clause as object of the infinitive - Infinitive म्हणजे क्रियापदाच्या पूर्वी टू वापरून त्यापुढे क्रियापदाचे मूळ रूप वापरतात. उदाहरणार्थ to speak. to know, to come, to go, to work. जेव्हा नवीन क्लास वाक्यात आलेल्या इन्फिनिटीव्ह चे कर्म म्हणून कार्य करतो तेव्हा तो Noun clause as object of the infinitive असतो. eg. I wanted to know what he spoke. I wanted to know - main Clause What he spoke - Noun clause as object of the infinitive ‘to know’ eg. 1) He was prepared to do whatever it was told. 2) He was eager to know what had happened. वरील अधोरेखित noun clause हे ठळक केलेल्या infinitive चे कर्म आहेत.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!