सुविचार
By -CDD
August 08, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी, माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देवून जाते...!*_
_*2) माणूस जन्मल्यानंतर तिनच वर्षात बोलायला शिकतो पण कधी, कुठे, आणि कस, काय बोलाव हे शिकायला त्याच सगळं आयुष्य जात...!*_
_*3) घराच्या भिंती कितीही सुंदर असल्या तरी घरातल्या माणसांची आपुलकीच त्या घराला घरपण देत असते... नाही तर कितीही महागडा असलेला एशियन पेंन्टचा कलर घराला आत्मियता देऊ शकत नाही...!*_
_*4) आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. कथा सांगता येत असतात पण व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्या लागतात...!*_
_*5) प्रगती एवढी झाली आहे की, हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता-ऐकता येते. आणि अधोगती इतकी झाली आहे की, जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत...!*_
Tags:
