सुविचार
By -CDD
August 08, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) लोकांनी दिलेल्या शंभर सल्यापेक्षा अनुभवाची एक ठेच लाख मोलाची असते त्यामुळे आयुष्यात ठेचा लागल्या पाहीजेत...!*_
_*2) तुम्ही कितीही हुशार असाल पण... जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हे माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीचं उपयोग नाही...!*_
_*3) माणसाचं आयुष्य त्या पोत्यासारखं असतं आपल्याला ते पोत अनुभवान, ज्ञानानं, आणि कर्तृत्वाने भरायचं असतं कारण रिकामं पोत कधी उभा राहू शकत नाही. बाजारात त्या रिकाम्या पोत्याच्या बारदाण्याला फारशी किंमत ही नसते...!*_
_*4) विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं चांगलं. परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केलेलं चांगलं. आपण आनंदात असलो तर, आयुष्य सुंदर ठरते. पण आपल्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरते...!*_
_*5) आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. कारण अहंकारापासून ते लांब असतं. "हम कुछ है" हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच...!*_
Tags:
