सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपल्या कर्तृत्वात इतरांचेही योगदान दडलेलं असतं... कारण, समुद्रात जरी पाणी अथांग असले तरी सत्य हेच आहे की, ते नद्यांचं ऋण आहे...!*_ _*2) अर्धवट शिक्षण, अर्धवट ज्ञान अर्धवट संस्कार माणसाला ऊद्धट बनवतात. अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल...!*_ _*3) ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना प्रत्येक ठिकाणी वाकावच लागतं आणि ते वाकणं म्हणजे लाचारी किंवा कमजोरी नसते तर कर्तव्यापोटी असलेला पवित्र भाव असतो...!*_ _*4) शब्द कोडी सोडवताना बुध्दीची कसोटी लागते...! तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते...! नशिबाला दोष का द्यावा.? स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावेत...!*_ _*5) चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो ना, तोच अनुभव नंतर योग्य तो निर्णय घ्यायला शिकवतो.. कारण परिस्थितीशी संघर्ष करतांना कोणी कोणासाठी नसतो पण, ती परिस्थिती बदलली की वाटा बदलणारे ही आपसूकच पुढे पुढे येत असतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!