सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर नाही, त्याच्या जागी उभं राहावं लागतं...!*_
_*2) थोडं फार सहन ही करता आलं पाहिजे, कारण आपल्यातही ब-याच कमतरता असतात... त्याला इतर लोक सहन करत असतात...!*_
_*3) वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातुन माणसाची मानसिकता भक्कम होत जाते...!*_
_*4) नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतेच...! आयुष्यात अशी मनोबल खचविणारी अनेक वळणे येत असतात... त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो, तोच स्वप्नपूर्ती करू शकतो...!*_
_*5) एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा ठेवणं सोडून द्यावी. परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल, कारण मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात...!*_
Tags:
